December 28, 2012

Mitra Asatat Baki Mast...!!!



Marathi Font poem based on best friends.

Sale mitra asatat baki mast...!!!

"काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?"
"तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!"

हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं.
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं!
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं!
निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं!
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त!
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं!
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

प्रत्यॆक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं!
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं!
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं!
Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा!

December 26, 2012

Marathi Majedar Questions



These are some funny marathi questions which makes us to think. Do you have answer to these ??

Marathi majedar, funny questions that are hard to answer.
  1. अनुभवी डॉक्टर ही प्रैक्टिस का करतात ?
  2. आपला जन्म इतरांसाठी झाला आहे तर इतर लोक कशासाठी जन्माला आलेत ?
  3. शेंगदाना ऑइल शेंगदान्यापासून, सन फ्लावर ऑइल सुर्यफुलापासुन, तर बेबी ऑइल कशापासून बनवतात ?
  4. टारझन ला दाढ़ी का नव्हती ?
  5. प्रकाशाचा वेग माहिती आहे, पण अंधाराचा वेग किती असतो ?
  6. गोल पिज़्ज़ा नेहमी चौकोनी बॉक्स मधे का पाठवतात ?
  7. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीला 'बिल्डिंग' का म्हणतात ?
  8. फ्री गिफ्ट म्हणजे काय? गिफ्ट तर फ्री'च असत ना.
  9. २१ म्हणजे ट्वेंटी वन , ३१ म्हणजे थर्टी वन , तर ११ म्हणजे वन्टी वन का नाही ?

December 25, 2012

Marathi majeshir mhani (part 17)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या 
  2.  तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे 
  3.  तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ
  4.  तळहाताने चंद्र झाकत नाही
  5.  तळे राखी तो पाणी चाखी
  6.  तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी
  7.  तहान लागल्यावर आड खणणे
  8.  ताकातल्या तुपासारखे, सौंदर्य 
  9.  ताकापुरते रामायण
  10.  ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे
  11.  तागास तूर लागू न देणे
  12.  ताटाखालचं मांजर
  13.  ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच
  14.  तारेवरची कसरत
  15.  ती नाही घरी नी गमजा करी
  16.  तीन तिघडा काम बिघाडा
  17.  तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे
  18.  तुकाराम बुवांची मेख
  19.  तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना
  20.  तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही
  21.  तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा
  22.  तुरात दान, महापुण्य
  23.  तुला नं मला, घाल कुत्र्याला
  24.  तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी
  25.  तेरड्याचे रंग तीन दिवस
  26.  तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे
  27.  तेलणीवर रुसली अंधारात बसली
  28.  तोंड करी बाता अन ढुंगण खा‌ई लाथा
  29.  तोंड दाबून बुक्क्यांचा मार
  30.  तोंडात तीळ भिजत नाही
  31.  तोबऱ्याला पुढे लगामाला मागे
  32.  त्यात काही राम नाही
  33.  दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत
  34.  दहा गेले पाच उरले
  35.  दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.


Marathi majeshir mhani (part 16)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  जे न देखे रवि ते देखे कवि
  2.  जे पिंडी ते ब्रम्हांडी
  3.  जे फुकट ते पौष्टीक
  4.  जेथे पिकतं तिथे विकतं नाही
  5.  जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत
  6.  जो गुण बाळा तो जन्म काळा
  7.  जो नाक धरी, तो पाद करी
  8.  जो श्रमी त्याला काय कमी
  9.  जोकून खाणार, कुंथुन हागणार
  10.  जोवरी पैसा तोवरी बैसा
  11.  ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी
  12.  ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये
  13.  ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर
  14.  ज्याचं जळतं त्यालाच कळतं
  15.  ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला
  16.  ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही
  17.  ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी
  18.  ज्याची दळ त्याचे बळ
  19.  ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपो‌आप
  20.  ज्याच्या हाती ससा तो पारधी
  21.  ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं
  22.  ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी
  23.  ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
  24.  ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा
  25.  ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
  26.  थांबला तो संपला
  27.  थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे
  28.  थेंबे थेंबे तळे साचे
  29.  थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे 
  30.  थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान
  31.  थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे
  32.  येडं पेरलयं अन उगवलयं खुळं
  33.  येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे
  34.  येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या
  35.  तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.


Marathi majeshir mhani (part 15)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया 
  2.  झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी 
  3.  झारीतले शुक्राचार्य 
  4.  झालं गेलं गंगेला मिळालं
  5.  टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही
  6.  टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
  7.  टिटवेदेखील समुद्र आटविते
  8.  गुळाला मुंगळे चिकटतातच
  9.  गोगल गाय पोटात पाय
  10.  गोड बोलून गळा कापणे
  11.  गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे 
  12.  गोरा गोमटा आणि कपाळ करंटा 
  13.  गोष्ट लहान, सांगण महान 
  14.  गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी 
  15.  गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट
  16.  ठकास महाठक 
  17.  ठण ठण पाळ मदन गोपाळ
  18.  ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला 
  19.  ठेवले अनंते तैसेची रहावे 
  20.  ठोसास ठोसा 
  21.  डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा
  22.  डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही
  23.  डोंगर पोखरून उंदीर काढणे 
  24.  डोंगरा‌एवढी हाव, तिळा एवढी धाव
  25.  डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते
  26.  डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू
  27.  ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो
  28.  ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला
  29.  ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी 
  30.  ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे 
  31.  ढोंग धतोरा, हाती कटोरा
  32.  ढोरात ढोर, पोरात पोर
  33.  याची देहा, याची डोळा
  34.  याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
  35.  ये ग साळू दोघं लोळू.


Marathi majeshir mhani (part 14)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  जनात बुवा आणि मनात कावा
  2.  जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला
  3.  जमता दशमा ग्रह
  4.  जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण
  5.  जलात राहून माशाशी वैर कशाला?
  6.  जळतं घर भाड्याने कोण घेणार?
  7.  जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं
  8.  जशास तसे
  9.  जशी कामना तशी भावना
  10.  जशी देणावळ तशी धुणावळ
  11.  जशी नियत तशी बरकत
  12.  जसा गुरु तसा चेला
  13.  जसा भाव तसा देव
  14.  जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा
  15.  जातीसाठी खावी माती
  16.  जात्यातले रडतात, सुपातले हसतात
  17.  जात्यावर बसले की ओवी सुचते
  18.  जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
  19.  जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड
  20.  जाव‌ई पाहुणा आला म्हणून रेडा दुध दे‌ईल काय?
  21.  जाव‌ई माझा भला आणि लेक बा‌ईलबुध्या झाला
  22.  जावयाचं पोर हरामखोर
  23.  जावा जावा आणि उभा दावा
  24.  जावा जावा हेवा देवा
  25.  जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी
  26.  जिकडे सु‌ई तिकडे दोरा
  27.  जिच्या घरी ताक तिचे वरती नाक
  28.  जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी 
  29.  जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही
  30.  जिथे कमी तिथे आम्ही
  31.  जी नाही गोंदणार ती नाही नांदणार
  32.  जुनं ते सोनं नवं ते हवं
  33.  झगा मगा माझ्याकडे बघा
  34.  झाकली मुठ सव्वालाखाची 
  35.  झाड जावो पण हाड न जावो.


December 24, 2012

Marathi majeshir mhani (part 13)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  चढेल तो पडेल
  2.  चने खा‌ईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे
  3.  चमडी जा‌ईल पण दमडी जाणार नाही
  4.  चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही
  5.  चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव
  6.  चांदणे चोराला, उन घुबडाला
  7.  चांभाराची नजर जोड्यावर
  8.  चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा
  9.  चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला
  10.  चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
  11.  चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती
  12.  चालत्या गाडीला खीळ घालणे
  13.  चिंती परा ते ये‌ई घरा
  14.  चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते
  15.  चिपट्यात काय काय करू?
  16.  चुकलेला फकीर मशिदीत
  17.  चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे
  18.  चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच
  19.  चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना
  20.  चोपदार तुपाशी, राजा उपाशी
  21.  चोर तो चोर वर शिरजोर
  22.  चोर नाही तर चोराची लंगोटी
  23.  चोर सोडून संन्याशाला सुळी
  24.  चोराच्या उलट्या बोंबा
  25.  चोराच्या मनांत चांदणं
  26.  चोराच्या वाटा चोरालाच माहीत
  27.  चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या
  28.  चोराला सुटका, आणि गावाला फटका
  29.  चोरावर मोर
  30.  चोरीचा मामला हळू हळू बोंबला
  31.  चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची 
  32.  चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते
  33.  जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर
  34.  जगाच्या कल्याणा संताची विभुती
  35.  जनाची नाही तरी मनाची तरी जरा.

December 21, 2012

Marathi majeshir mhani (part 12)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी 
  2.  घटाकभर नाही माप अन रात्री ये‌ई हिवताप
  3.  घर गेले विटाळा शेत गेले कटाळा
  4.  घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी 
  5.  घर ना दार चावडी बिऱ्हाड (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड)
  6.  घर फिरले की वासेही फिरतात
  7.  घर साकड नि बा‌ईल भाकड
  8.  घरचा उंबरठा दारालाच माहीत
  9.  घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा
  10.  घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे
  11.  घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा
  12.  घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा 
  13.  घराची कळा अंगण सांगते
  14.  घरात घरघर चर्चा गावभर
  15.  घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान 
  16.  घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ
  17.  घरात नाही कौल, रिकामा डौल
  18.  घरात नाही तुरी भट भटणीला मारी
  19.  घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा 
  20.  घरासारखा गुण, सासू तशी सून
  21.  घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात
  22.  घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी 
  23.  घरोघरी मातीच्या चुली
  24.  घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं ये‌ई
  25.  घाण्याचा बैल
  26.  घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी 
  27.  घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर
  28.  घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक 
  29.  घे सुरी आणि घाल उरी
  30.  घेणे न देणे, कंदिल लावून जाणे
  31.  घोंगड अडकलं
  32.  घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा
  33.  घोडामैदान जवळ असणे
  34.  घोडे खा‌ई भाडे
  35.  घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.


November 16, 2012

Marathi majeshir mhani (part 11)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  "ग" ची बाधा झाली
  2.  गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
  3.  गंगेत घोडं न्हालं
  4.  गरज सरो अऩ वैद्य मरो
  5.  गरजवंताला अक्कल नसते
  6.  गरजेल तो पडेल काय?
  7.  गरीबाच्या दाराला सावकाराची कडी 
  8.  गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं 
  9.  गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी
  10.  गळ्यातले तुटले ओटीत पडले
  11.  गवयाचे मुल सुरांनीच रडणार 
  12.  गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे 
  13.  गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली
  14.  गाठ पडली ठकाठका 
  15.  गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो 
  16.  गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं) 
  17.  गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता
  18.  गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ 
  19.  गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी 
  20.  गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी
  21.  गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य
  22.  गाढवाला गुळाची चवं काय?
  23.  गाता गळा, शिंपता मळा
  24.  गावंढ्या गावात गाढवी सवाशीण 
  25.  गाव करी ते राव न करी
  26.  गाव करील ते राव करील काय? 
  27.  गाव तिथे उकिरडा 
  28.  गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड
  29.  गावात घर नाही रानात शेत नाही 
  30.  गुप्तदान महापुण्य 
  31.  गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर) 
  32.  गुरुची विद्या, गुरुलाच फळली 
  33.  गुलाबाचे कांटे जसे आ‌ईचे धपाटे 
  34.  गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून? 
  35.  गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य 


Marathi majeshir mhani (part 10)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  खतास महाखत
  2.  खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
  3.  खऱ्याला मरण नाही
  4.  खा‌ई त्याला खवखवे
  5.  खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  6.  खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे
  7.  खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये
  8.  खाजवुन अवधान आणणे
  9.  खाजवुन खरुज काढणे
  10.  खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी
  11.  खाण तशी माती
  12.  खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते
  13.  खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही
  14.  खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले
  15.  खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे
  16.  खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत
  17.  खादाड खा‌ऊ लांडग्याचा भा‌ऊ
  18.  खायची बोंब अन हगायचा तरफडा
  19.  खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे
  20.  खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी
  21.  खायला कहर आणि भु‌ईला भार
  22.  खायला कोंडा अऩ निजायला धोंडा
  23.  खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त)
  24.  खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे
  25.  खालल्या घरचे वासे मोजणारा
  26.  खाली मुंडी, पाताळ धुंडी
  27.  खाल्ल्याघरचे वासे मोजणारा
  28.  खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला
  29.  खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा
  30.  खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी
  31.  खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा
  32.  खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली
  33.  खोट्याच्या कपाळी गोटा


Marathi majeshir mhani (part 9)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे)
  2.  कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
  3.  कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही
  4.  कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
  5.  काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली
  6.  कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
  7.  कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर ये‌ईलच
  8.  कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी 
  9.  कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा
  10.  कुठे तरी पाल चुकचुकतेय
  11.  कुठेही जा, पळसाला पाने तीनच
  12.  कुडास कान ठेवी ध्यान
  13.  कुडी तशी पुडी
  14.  कुणाचा कुणाला पायपूस नाही
  15.  कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस
  16.  कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे
  17.  कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा
  18.  कुत्र्या मांजराचे वैर
  19.  कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
  20.  कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ
  21.  कुसंतनापेक्षा निसंतान बरे
  22.  केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी
  23.  केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे
  24.  केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले
  25.  केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी
  26.  केळ्याचा डोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर
  27.  केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले
  28.  कोंड्याचा मांडा करुन खाणे
  29.  कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही
  30.  कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे)
  31.  कोल्हा काकडीला राजी
  32.  कोल्ह्यास द्राक्षे आंबट
  33.  कोळसा कितीही उगाळला तरी काळाच



Marathi majeshir mhani (part 8)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  का ग बा‌ई उभी, घरात दोघी तिघी
  2.  काकडीची चोरी, फाशीची शिक्षा
  3.  काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
  4.  काखेत कळसा अऩ गावाला वळसा
  5.  काजव्याकडून सुर्याची समीक्षा
  6.  काट्याचा नायटा होतो
  7.  काट्याने काटा काढायचा
  8.  काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
  9.  काडी चोर तो माडी चोर
  10.  कानात बुगडी, गावात फुगडी
  11.  काप गेले नि भोका रवली(भोके राहिली)
  12.  काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही
  13.  काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम
  14.  काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच
  15.  काम नाही घरी सांडून भरी
  16.  काम ऩ धंदा, हरी गोविंदा
  17.  कामाचा ना धामाचा भाकरी खातो नेमाचा
  18.  कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी
  19.  काय करु अऩ कस करु?
  20.  काय बा‌ई अशी तु शिकवले तशी
  21.  काळ आला होता पण वेळ आली नव्हती
  22.  काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची
  23.  कावळा गेला उडून गू खा चाटून
  24.  कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी
  25.  कावळा बसायला आणि फांदी तुटायला


Marathi majeshir mhani (part 7)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं
  2.  कच्च्या गुरुचा चेला
  3.  कठीण समय येता कोण कामास येतो
  4.  कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच 
  5.  कण्हती कुथती, मलिद्याला उठती
  6.  कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी
  7.  कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
  8.  कपिलाषष्टीचा योग
  9.  कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला
  10.  कर नाही त्याला ड़र कशाला?
  11.  करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
  12.  करणी कसायची, बोलणी मालभावची
  13.  करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती
  14.  करवंदीच्या जाळीला काटे
  15.  करायला गेलो एक अऩ झाले एक(भलतेच)
  16.  करावे तसे भरावे
  17.  करीन ती पूर्व
  18.  करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले
  19.  करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव
  20.  करू गेले काय? अन उलटे झाले काय?
  21.  कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड
  22.  कळते पण वळत नाही
  23.  कशात काय अन फाटक्यात पाय
  24.  कशात ना मशात, माकड तमाशात
  25.  कष्ट करणार त्याला देव देणार


Marathi majeshir mhani (part 6)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  आयत्या बिळात नागोबा
  2.  आराम हराम आहे
  3.  आरोग्य हीच धनसंपत्ती
  4.  आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
  5.  आला भेटीला धरला वेठीला
  6.  आली अंगावर, घेतली शिंगावर
  7.  आली चाळीशी, करा एकादशी
  8.  आली सर तर गंगेत भर
  9.  आलीया भोगासी असावे सादर
  10.  आले मी नांदायला, मडके नाही रांधायला
  11.  आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला
  12.  आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान
  13.  आळश्याला दुप्पट काम
  14.  आळ्श्याला गंगा दूर
  15.  आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी
  16.  आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर 
  17.  आवळा देवून भोपळा काढणे (आवळा देवून कोहळा काढणे) 
  18.  आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे
  19.  आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा
  20.  आशा सुटेना अन देव भेटेना
  21.  आसू ना मासू, कुत्र्याची सासू
  22.  ओ म्हणता ठो ये‌ईना
  23.  ओठात एक आणि पोटात एक
  24.  ओठी ते पोटी
  25.  ओल्या बरोबर सुके जळते
  26.  ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक
  27.  ओळखीचा चोर जीवे मारी
  28.  ओसाड गावी एरंडी बळी
  29.  औटघटकेचे राज्य
  30.  औषधावाचून खोकला गेला


Marathi majeshir mhani (part 5)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  आपण आरे म्हटले की कारे आलेच
  2.  आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार
  3.  आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच
  4.  आपण सुखी तर जग सुखी
  5.  आपलंच घर, हागुन भर
  6.  आपला आळी, कुत्रा बाळी
  7.  आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या
  8.  आपला हात, जग्गन्नाथ
  9.  आपलाच बोल, आपलाच ढोल
  10.  आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून 
  11.  आपली पाठ आपल्याला दिसत नाही
  12.  आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी
  13.  आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून 
  14.  आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे
  15.  आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन
  16.  आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ
  17.  आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे
  18.  आपलेच दांत अऩ आपलेच ओठ
  19.  आपल्या कानी सात बाळ्या
  20.  आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते
  21.  आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते
  22.  आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
  23.  आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
  24.  आय नाय त्याला काय नाय
  25.  आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार


November 15, 2012

Marathi majeshir mhani (part 4)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani

  1.  आगीशिवाय धूर दिसत नाही
  2.  आचार भ्रष्टी, सदा कष्टी
  3.  आज अंबारी, उद्या झोळी धरी
  4.  आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर
  5.  आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी
  6.  आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
  7.  आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई
  8.  आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  9.  आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो 
  10.  आधणातले रडतात, सुपातले हसतात
  11.  आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा
  12.  आधी करा मग भरा
  13.  आधी करावे मग सांगावे
  14.  आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण
  15.  आधी गुंतू नये, मग कुंथु नये
  16.  आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण
  17.  आधी नमस्कार मग चमत्कार
  18.  आधी पोटोबा, मग विठोबा
  19.  आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे
  20.  आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना
  21.  आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
  22.  आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ
  23.  आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस
  24.  आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  25.  आपण आपल्याच सावलीला भितो


November 9, 2012

Marathi majeshir mhani (part 3)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1. असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  2. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  3. असतील चाळ तर फिटतील काळ.
  4. असतील मुली तर पेटतील चुली.
  5. असतील शिते तर जमतील भूते.
  6. असुन नसुन सारखा.
  7. असून अडचण नसून खोळांबा.
  8. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  9. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  10. असेल दाम तर हो‌ईल काम.
  11. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  12. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  13. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला? 
  14. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  15. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  16. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  17. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  18. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  19. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  20. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  21. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  22. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  23. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  24. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  25. आग लागल्यावर विहीर खणणे.




Marathi majeshir mhani (part 2)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

  1. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  2. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  3. अती केला अनं मसनात गेला.
  4. अती झालं अऩ हसू आलं.
  5. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  6. अती तिथं माती.
  7. अती परीचयात आवज्ञा.
  8. अती राग भिक माग.
  9. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  10. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  11. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही. 
  12. अपयश हे मरणाहून वोखटे.
  13. अपापाचा माल गपापा.
  14. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  15. अप्पा मारी गप्पा.
  16. अर्धा वैद्या मरणास खाद्य.
  17. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  18. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  19. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  20. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  21. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  22. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  23. अळी मिळी गुपचिळी.
  24. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  25. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

Marathi majeshir mhani (part 1)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani (part 2)

  1. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.
  2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  8. अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
  9. अंधारात केले पण उजेडात आले.
  10. अंधेर नगरी चौपट राजा.
  11. अकिती आणि सणाची निचिती.
  12. अक्कल खाती जमा.
  13. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  14. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  15. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  16. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  17. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  18. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  19. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  20. अघळ पघळ वेशीला ओघळ.
  21. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  22. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  23. अडली गाय खाते काय.
  24. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  25. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

April 23, 2012

Marathi SMS : Post 1 (In Marathi font)

Marathi SMS in Marathi Font
Type : Friendship, Emotional

1. पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
पण खंत वाटे या जिवा,
सोबत का नसतोस तू ???

2. २ दिवसाची मैत्री मनाला वेड लाउन गेली
जाताना डोळ्यात अश्रु देऊन गेली
आयुष्यात आठवण नेहमीच तुझी येत राहिल
तुझ्यविना मैत्रि शब्द नेहमीच अधुरा राहिल.

3. कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती

4. तुझी नि माझी मैत्री एक गाठ असावी
कोणत्याही मतभेदाला तिथे वाट नसावी
माझ्या सुखात हसावी तुझी आसवे
तर तुझ्या दुखात अश्रु माझे असावेत

5. एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला
नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला

6. मैत्री म्हणजे एक विसावा
मैत्री म्हणजे एक सहारा
आयुष्य रूपी खोल सागराचा
मैत्री म्हणजे एक हिरवा किनारा

7. एक आस एक विसावा
तुझा चेहरा रोज दिसावा
तुझी आठवण न यावी तो दिवस नसावा
हृदयाच्या प्रत्येक कोपर्यात तुझासारखा मित्र असावा

8. नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची
जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा

9. जीवन एक रहस्य आहे
इथे सगळे लपवायचे असते
मनात कितीही दुःख असेल तरी
दुसर्यापुढे हसायचे असते

10. जे  जोडले ते नाते
जी जड़ते ती सवय
जी लागते ती ओढ़
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो सहवास
आणि ज्या निरंतर राहतात
त्या आठवणी

April 20, 2012

Marathi Fishponds (Shelapagote) part 4

1. जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या 
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या  

2. तुझ गाव पूना 
माझ गाव पूना 
आपली दोघांची जोड़ी म्हणजे 
तम्बाखू आणि चुना

3. तू सूरजमुखी , मी चंद्रमुखी
मै तुजसे दुखी तू मुजसे दुखी
तू  छत से कूद जा..
मै भी सुखी तू भी सुखी
 

4. हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू
.
.
ह्या दोघांची एकाच गंगू

5. माझी ऊँची २ फूट
स्यांडल ची ऊँची ३ फूट
अशी टोटल मी ५ फूट

6. चश्मा लावला तर मुले मला बघत नाही
चश्मा काढला तर मुले मला दिसत नाही

7. नज़रे मिलानेको बहोत जी चाहता है
पर कम्बख्त चश्मा बिच मे आता है

8. चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

9. शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणि म्हणे मी हनुमान भक्त

10. करायला गेली रक्तदान
करायला गेली रक्तदान
डॉक्टर म्हणे बाटली नाही चमचा आण

11. खिशात नाही आना 
अणि
म्हणे मला बाजीराव म्हणा

Marathi Fishponds (Shelapagote) part 3

1. होटो पे ना है
दिल मे हा है
.
.
होटो पे ना है
दिल मे हा है
.
.
शशि कपूर कहता है
मेरे पास माँ है


2.  यशोमती मैय्या से बोले नंदलाला 
वाह वाह
यशोमती मैय्या से बोले नंदलाला
माँ, इसको लगा डाला तो लाइफ झिंगालाला 


3. तेरा इंतज़ार मै करू कबतक
तेरा इंतज़ार मै करू कबतक
कैमरामन अजय के साथ
दीपक चौरसिया

आज तक...!!!

4. बहार आने से पहले फिजा आ गयी
वाह वाह
बहार आने से पहले फिजा आ गयी
फुल खिलने से पहले बकरी खा गयी

5. आत्मा छोड़ गया शरीर पुराना
वाह वाह
आत्मा छोड़ गया शरीर पुराना
.

.

दीदी तेरा देवर दीवाना

6. आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळने असतील
खाच खळगे असतील
तेव्हा चांगली चप्पल वापरत जा

7. आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेत
पण चप्पल बूट बाहेरच राहुदेत
 

8. परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
... बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात


9. यु देखा ना करो हमें हँसते हँसते
यु देखा ना करो हमें हँसते हँसते
मेरे दोस्त बड़े ख़राब है
तुम्हे कहेंगे भाभीजी नमस्ते

10. देख के तेरी ये बड़ी बड़ी आँखे
मेरा दिल बोला
देख के तेरी ये बड़ी बड़ी आँखे
मेरा दिल बोला
बेडूक आला बेडूक आला
 


11. कृपया पेट्रोल पम्प जवळ फुन्कू नका
तुमचे आयुष्य कवडीमोलाच आहे
.
.
असे तुम्हालाही वाटत असेल
कार
पेट्रोल नक्कीच महाग आहे

Marathi Fishponds (Shelapagote) part 2

1. चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली
लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

2. उठे सबके कदम
तारा रम पम पम
कभी ऐसे मार्क्स लाया करो
कभी झिरो कभी वन
कभी उससे भी कम
कभी तो फेल होके आया करो  

3. पुढून सपाट माघुन सपाट
ही तर आहे गोदरेज ची कपट

4. तुम इतना क्यों मुस्कुरा रही हो
क्या काम है जो बुला रही हो

5. कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात

6. बोलतो खनखनित 
चालतो खनखनित
जवळ अल की वाटत
द्यावी सनसनित


7. आई ची इच्छा होती मुलगा व्हावा
वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी
... झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली

8. छुम छुम कर आयी
झूम झूम कर गयी
.. सिंदूर लेके खड़ा था
वोह राखी बांधकर चली गयी

9. दूर से देखा तो आसमान की परी
दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

10. झकास  टोपी माझी दिसते तुला भकास
नजर च तुझी अशी जस किड लागले पिकास


11. बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

April 19, 2012

Marathi Fishponds (Shelapagote) part 1

These are the collections of fish ponds (known as shelapagote in Marathi) which are used in college annual functions. Hope you will like them.

1. स्वताला समज़तो मिथुन...!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून...!

2. सेल..  सेल..  सेल...
खोबरेल तेलाचा  सेल..
आता तरी लाव तुज्या  ज्हिप्र्याना तेल ...

3. तुम जिस साबुन से नहाती हो.....
तुम जिस साबुन से नहाती हो.....
उस साबुन को किस साबुन से धोती हो....?

 4. तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी
मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी

5. बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति 
शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

6. अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी...
लिहुन लिहुन झिजले खडु....  
लिहुन लिहुन झिजले खडु....

आता तरी द्या लग्नाचे लाडु....... 

7. लुकड़या मुली साठी...  
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती  
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती  
फिर भी दिन भर बक बक करती

8. हुसेन हुसेन सद्दाम हुसेन 
हुसेन हुसेन सद्दाम हुसेन 

.
.
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेल

9. माघुन पाहिल तर इस्तरी कड़क
समोरून पहिल तर डाम्बरी सड़क


10. रूप तेरा मस्ताना
रूप तेरा मस्ताना
बेंच तुटेल बसताना


11. ... म्हणतो मुलिना चला आपण वडा पाव खाऊ
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात किती चांगला माझा भाऊ



12. डोक्याची झाली वाटी , हाडांची झाली काठी
तरी ........ला  वाटे सर्व मुले आपल्या पाठी


Tags : Fishponds, Fish-Ponds, Funny Sayings