November 16, 2012

Marathi majeshir mhani (part 11)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  "ग" ची बाधा झाली
  2.  गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
  3.  गंगेत घोडं न्हालं
  4.  गरज सरो अऩ वैद्य मरो
  5.  गरजवंताला अक्कल नसते
  6.  गरजेल तो पडेल काय?
  7.  गरीबाच्या दाराला सावकाराची कडी 
  8.  गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं 
  9.  गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी
  10.  गळ्यातले तुटले ओटीत पडले
  11.  गवयाचे मुल सुरांनीच रडणार 
  12.  गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे 
  13.  गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली
  14.  गाठ पडली ठकाठका 
  15.  गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो 
  16.  गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं) 
  17.  गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता
  18.  गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ 
  19.  गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी 
  20.  गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी
  21.  गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य
  22.  गाढवाला गुळाची चवं काय?
  23.  गाता गळा, शिंपता मळा
  24.  गावंढ्या गावात गाढवी सवाशीण 
  25.  गाव करी ते राव न करी
  26.  गाव करील ते राव करील काय? 
  27.  गाव तिथे उकिरडा 
  28.  गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड
  29.  गावात घर नाही रानात शेत नाही 
  30.  गुप्तदान महापुण्य 
  31.  गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर) 
  32.  गुरुची विद्या, गुरुलाच फळली 
  33.  गुलाबाचे कांटे जसे आ‌ईचे धपाटे 
  34.  गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून? 
  35.  गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य 


Marathi majeshir mhani (part 10)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  खतास महाखत
  2.  खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
  3.  खऱ्याला मरण नाही
  4.  खा‌ई त्याला खवखवे
  5.  खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  6.  खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे
  7.  खा‌ऊन माजावे पण टाकून माजू नये
  8.  खाजवुन अवधान आणणे
  9.  खाजवुन खरुज काढणे
  10.  खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी
  11.  खाण तशी माती
  12.  खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते
  13.  खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही
  14.  खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले
  15.  खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे
  16.  खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत
  17.  खादाड खा‌ऊ लांडग्याचा भा‌ऊ
  18.  खायची बोंब अन हगायचा तरफडा
  19.  खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे
  20.  खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी
  21.  खायला कहर आणि भु‌ईला भार
  22.  खायला कोंडा अऩ निजायला धोंडा
  23.  खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त)
  24.  खायाला फुटाणे अन टांग्याला आठाणे
  25.  खालल्या घरचे वासे मोजणारा
  26.  खाली मुंडी, पाताळ धुंडी
  27.  खाल्ल्याघरचे वासे मोजणारा
  28.  खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला
  29.  खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा
  30.  खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी
  31.  खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा
  32.  खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली
  33.  खोट्याच्या कपाळी गोटा


Marathi majeshir mhani (part 9)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे)
  2.  कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
  3.  कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही
  4.  कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
  5.  काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली
  6.  कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
  7.  कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर ये‌ईलच
  8.  कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी 
  9.  कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा
  10.  कुठे तरी पाल चुकचुकतेय
  11.  कुठेही जा, पळसाला पाने तीनच
  12.  कुडास कान ठेवी ध्यान
  13.  कुडी तशी पुडी
  14.  कुणाचा कुणाला पायपूस नाही
  15.  कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस
  16.  कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे
  17.  कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा
  18.  कुत्र्या मांजराचे वैर
  19.  कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
  20.  कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ
  21.  कुसंतनापेक्षा निसंतान बरे
  22.  केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी
  23.  केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे
  24.  केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले
  25.  केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी
  26.  केळ्याचा डोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर
  27.  केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले
  28.  कोंड्याचा मांडा करुन खाणे
  29.  कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही
  30.  कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे)
  31.  कोल्हा काकडीला राजी
  32.  कोल्ह्यास द्राक्षे आंबट
  33.  कोळसा कितीही उगाळला तरी काळाच



Marathi majeshir mhani (part 8)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  का ग बा‌ई उभी, घरात दोघी तिघी
  2.  काकडीची चोरी, फाशीची शिक्षा
  3.  काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
  4.  काखेत कळसा अऩ गावाला वळसा
  5.  काजव्याकडून सुर्याची समीक्षा
  6.  काट्याचा नायटा होतो
  7.  काट्याने काटा काढायचा
  8.  काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
  9.  काडी चोर तो माडी चोर
  10.  कानात बुगडी, गावात फुगडी
  11.  काप गेले नि भोका रवली(भोके राहिली)
  12.  काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही
  13.  काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम
  14.  काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच
  15.  काम नाही घरी सांडून भरी
  16.  काम ऩ धंदा, हरी गोविंदा
  17.  कामाचा ना धामाचा भाकरी खातो नेमाचा
  18.  कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी
  19.  काय करु अऩ कस करु?
  20.  काय बा‌ई अशी तु शिकवले तशी
  21.  काळ आला होता पण वेळ आली नव्हती
  22.  काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची
  23.  कावळा गेला उडून गू खा चाटून
  24.  कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी
  25.  कावळा बसायला आणि फांदी तुटायला


Marathi majeshir mhani (part 7)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं
  2.  कच्च्या गुरुचा चेला
  3.  कठीण समय येता कोण कामास येतो
  4.  कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच 
  5.  कण्हती कुथती, मलिद्याला उठती
  6.  कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी
  7.  कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
  8.  कपिलाषष्टीचा योग
  9.  कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला
  10.  कर नाही त्याला ड़र कशाला?
  11.  करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
  12.  करणी कसायची, बोलणी मालभावची
  13.  करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती
  14.  करवंदीच्या जाळीला काटे
  15.  करायला गेलो एक अऩ झाले एक(भलतेच)
  16.  करावे तसे भरावे
  17.  करीन ती पूर्व
  18.  करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले
  19.  करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव
  20.  करू गेले काय? अन उलटे झाले काय?
  21.  कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड
  22.  कळते पण वळत नाही
  23.  कशात काय अन फाटक्यात पाय
  24.  कशात ना मशात, माकड तमाशात
  25.  कष्ट करणार त्याला देव देणार


Marathi majeshir mhani (part 6)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1.  आयत्या बिळात नागोबा
  2.  आराम हराम आहे
  3.  आरोग्य हीच धनसंपत्ती
  4.  आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
  5.  आला भेटीला धरला वेठीला
  6.  आली अंगावर, घेतली शिंगावर
  7.  आली चाळीशी, करा एकादशी
  8.  आली सर तर गंगेत भर
  9.  आलीया भोगासी असावे सादर
  10.  आले मी नांदायला, मडके नाही रांधायला
  11.  आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला
  12.  आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान
  13.  आळश्याला दुप्पट काम
  14.  आळ्श्याला गंगा दूर
  15.  आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी
  16.  आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर 
  17.  आवळा देवून भोपळा काढणे (आवळा देवून कोहळा काढणे) 
  18.  आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे
  19.  आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा
  20.  आशा सुटेना अन देव भेटेना
  21.  आसू ना मासू, कुत्र्याची सासू
  22.  ओ म्हणता ठो ये‌ईना
  23.  ओठात एक आणि पोटात एक
  24.  ओठी ते पोटी
  25.  ओल्या बरोबर सुके जळते
  26.  ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक
  27.  ओळखीचा चोर जीवे मारी
  28.  ओसाड गावी एरंडी बळी
  29.  औटघटकेचे राज्य
  30.  औषधावाचून खोकला गेला


Marathi majeshir mhani (part 5)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani




  1.  आपण आरे म्हटले की कारे आलेच
  2.  आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार
  3.  आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच
  4.  आपण सुखी तर जग सुखी
  5.  आपलंच घर, हागुन भर
  6.  आपला आळी, कुत्रा बाळी
  7.  आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या
  8.  आपला हात, जग्गन्नाथ
  9.  आपलाच बोल, आपलाच ढोल
  10.  आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून 
  11.  आपली पाठ आपल्याला दिसत नाही
  12.  आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी
  13.  आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून 
  14.  आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे
  15.  आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन
  16.  आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ
  17.  आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे
  18.  आपलेच दांत अऩ आपलेच ओठ
  19.  आपल्या कानी सात बाळ्या
  20.  आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते
  21.  आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते
  22.  आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
  23.  आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
  24.  आय नाय त्याला काय नाय
  25.  आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार


November 15, 2012

Marathi majeshir mhani (part 4)


These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani

  1.  आगीशिवाय धूर दिसत नाही
  2.  आचार भ्रष्टी, सदा कष्टी
  3.  आज अंबारी, उद्या झोळी धरी
  4.  आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर
  5.  आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी
  6.  आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
  7.  आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई
  8.  आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  9.  आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो 
  10.  आधणातले रडतात, सुपातले हसतात
  11.  आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा
  12.  आधी करा मग भरा
  13.  आधी करावे मग सांगावे
  14.  आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण
  15.  आधी गुंतू नये, मग कुंथु नये
  16.  आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण
  17.  आधी नमस्कार मग चमत्कार
  18.  आधी पोटोबा, मग विठोबा
  19.  आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे
  20.  आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना
  21.  आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
  22.  आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ
  23.  आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस
  24.  आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  25.  आपण आपल्याच सावलीला भितो


November 9, 2012

Marathi majeshir mhani (part 3)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani



  1. असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  2. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  3. असतील चाळ तर फिटतील काळ.
  4. असतील मुली तर पेटतील चुली.
  5. असतील शिते तर जमतील भूते.
  6. असुन नसुन सारखा.
  7. असून अडचण नसून खोळांबा.
  8. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  9. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  10. असेल दाम तर हो‌ईल काम.
  11. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  12. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  13. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला? 
  14. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  15. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  16. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  17. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  18. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  19. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  20. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  21. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  22. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  23. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  24. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  25. आग लागल्यावर विहीर खणणे.




Marathi majeshir mhani (part 2)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

  1. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  2. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  3. अती केला अनं मसनात गेला.
  4. अती झालं अऩ हसू आलं.
  5. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  6. अती तिथं माती.
  7. अती परीचयात आवज्ञा.
  8. अती राग भिक माग.
  9. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  10. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  11. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही. 
  12. अपयश हे मरणाहून वोखटे.
  13. अपापाचा माल गपापा.
  14. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  15. अप्पा मारी गप्पा.
  16. अर्धा वैद्या मरणास खाद्य.
  17. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  18. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  19. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  20. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  21. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  22. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  23. अळी मिळी गुपचिळी.
  24. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  25. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

Marathi majeshir mhani (part 1)

These are some of the funny phrases ( Mhani ) used by Marathi people. Marathi Majeshir Mhani.

Marathi majeshir mhani (part 2)

  1. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.
  2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  8. अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
  9. अंधारात केले पण उजेडात आले.
  10. अंधेर नगरी चौपट राजा.
  11. अकिती आणि सणाची निचिती.
  12. अक्कल खाती जमा.
  13. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  14. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  15. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  16. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  17. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  18. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  19. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  20. अघळ पघळ वेशीला ओघळ.
  21. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  22. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  23. अडली गाय खाते काय.
  24. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  25. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.